तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर (Tumsar Accident) : तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद (Tumsar ST Bus) एस. टी.बस तुमसरवरून मोहाडीकडे भरधाव जाणाऱ्या एस.टी बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो दुचाकीला (Tumsar Accident) ज़ोरदार धडक दिली. दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना ५ जुलै रोजी तुमसर-भंडारा (National Highway) राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली. जिवन गुलाब गोमासे (३०) रा.खरबी असे एस. टी अपघातात ठार झालेल्या विवाहीत तरुणांचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी सायंकाळी घरुन दुचाकीने जिवन हा घरच्या बकऱ्या शोधायला मोहाडीकडे जात असताना पावसाला सुरुवात झाली असल्याने मोहाडी मार्गे दुचाकीने घरी परत येत असताना तुमसरकडुन विरूध्द दिशेने येणाऱ्या तुमसर आगाराची (National Highway) तुमसर -भंडारा-नागपुर ह्या जलद बसने दूचाकी चालकाला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जागीच ठार झाला.
सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत गर्दी केली होती. दरम्यान सदर घनटेची माहीती मोहाडी पोलीसांना देण्यात आली. (Tumsar Police) मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल होत, सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिवन हा विवाहीत तरुण होता. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ, असा बराच मोठा आप्त गोमासे परिवार आहे. (Tumsar Accident) सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुधकावरा,बिट अंमलदार भोंगाडे,कुभलकर आदी करीत आहेत.