– सुधिर गोमासे
तुमसर (Tumsar Crime) : हरवलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेणे, बेवारस मृतदेहांची ओळख पटविणे, हरवलेले वाहन, मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर वस्तू शोधणे हे पोलिसांसाठी नेहमीच आव्हानात्मक कार्य असते. कायदा सुव्यवस्था राखणे, राजकीय व इतर आंदोलनाचे बंदोबस्त पाहणे, (Tumsar Crime) व्हीव्हीआयपी सुरक्षा सांभाळणे असे अनेक कार्य डोक्यावर असल्याने बऱ्याच वेळेला पोलीस इच्छा असूनही हरवलेली माणसे आणि वस्तूंच्या शोध कामासाठी सर्व शक्ती पणाला लावू शकत नाही. अगदी एका (Tumsar Police) पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीची किंवा एका ठिकाणातून हरवलेल्या मोबाईल किंवा वस्तूची माहिती शेजारील पोलीस स्टेशनपर्यंतही नसते. त्यामुळे (missing women) हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तूच्या शोधकार्याबद्दल पोलीस गंभीर नाहीत असा आरोप केला जात आहे.
बेपत्ता नागरीकांचा शो़ध घेण्यास पोलीस यंत्रणा अपयशी!
महाराष्ट्र पोलीस सिटीजन (Tumsar Police) या अधिकृत पोर्टल वरील आकडेवारी नुसार जिल्ह्यात मार्च ते जून या तिन महिन्यात अल्पवयीन, तरुण, तरुणी, मुलां मुलीसह ,वयोवृद्धात , जिल्ह्यातील पोलीस ठाण्या अंतर्गत २१८ नागरिक बेपत्ता असल्याचा (Tumsar Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविषयी जिल्हा पोलिस यंत्रणा मात्र बेपत्ता असलेल्यांना शोधण्यास अपयशी ठरली आहे?. तर एका (Tumsar Police) पोलीस स्टेशन हद्दीत तर एकाच दिवशी चार-पाच नागरिक बेपत्ता होत आहेत तर त्यामागचा कारण मानव तस्करी तर नाही? असाही संशय वळत आहे. याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करून फक्त थातुरमाथुर बेपत्ता रजिस्टर वर नोंद घेऊन संबंधित प्रकरनांना केराची टोपली दाखवण्याचा काम सुरु असल्याचे समोर आले आहे. यावर जिल्हा पोलिस प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. जिल्ह्यातील (Tumsar Police) पोलीस यंत्रणा फक्त व्हीव्हीआयपी लोकांकरिता तर नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.यावर जिल्ह्यातील सक्षम अधिकारी कोणती कारवाई करतात जेणेकरून शासन व पोलिस यंत्रनेवर नागरिकांचे विश्वास टिकून राहील.
सव्वा वर्षांपूर्वी महीला आयोगाने घेतली होती दखल
सुमारे एक ते सव्वा वर्ष पुर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर भंडारा येथे येऊन गेल्या. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला व तरुणी बेपत्ता झाल्या असून त्यांचा अजून शोध लागला नाही. असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. भंडारा जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या तरुणी (Tumsar Crime) व महिलांची माहिती त्यांनी जाणून घेतली होती. पोलीस प्रशासनाला त्यांनी बेपत्ता तरुणी व महिलांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. हे विशेष. दरम्यान महिला आयोगाच्या दणक्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले होते. तुमसर तालुक्यातील (Tumsar Police) गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत कवलेवाडा येथिल बेपत्ता तरुणीची शोध मोहीम त्याच्याच एक भाग समोर आला होता.पऱतु कारवाई नंतर काहींच निष्पन्न झाले नाही.
जिल्ह्यात बेपत्ता असलेल्या नागरीकांचा शोध घेणे सुरू आहे.याविषयी स्थानिक (Tumsar Crime) गुन्हे शाखा कडुन चौकशी करुन माहीती कळवितो.
– लोहीत मतानी, पोलीस अधिक्षक भंडारा.