आमदार राजु कारेमोरे यांच्या प्रयत्नाना यश
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Tumsar general hospital) : येथिल सुभाषचंद्र बोस १०० खाटाच्या (Sub-district hospital) उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून २०० खाटाचे सामान्य रुग्णालय (Tumsar general hospital) करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दैनिक देशोन्नतीनें सदर श्रेणीवर्धानाचे प्रकरण रेटून धरले होते याची दखल आमदार राजू कारेमोरेंनी घेतली.व सदर १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन २०० खाटाचे सामान्य रुग्णालय करण्यासाठी आमदार राजु कारेमोरेंनी (MLA Raju Karemore) राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.अखेर राज्य सरकारने दखल घेत आमदार राजु कारेमोरे यांनी शासनाकडून मंजुरी प्राप्त करून घेतली. आमदार राजू कारेमोरे या़ंच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
तुमसर तालुक्यातील नागरिकांसाठी २०० खाटांच्या सामान्य
रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपयांची निधी खेचून आणली आहे. तुमसर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या Tumsar general hospital सामान्य रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास “विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात देण्यात आली आहे.तर सदर श्रेणीवर्धीत रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.असे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व सहीने राज्य शासनाचे दिनांक ०८ ऑगस्ट ला परिपत्रक धडकले आहे.तुमसर तालुक्याची लोकसंख्या २ लाख २६ हजार १०८ इतकी आहे. उपजिल्हा रुग्णालयात शहरासह तालुक्यातील नागरिक आरोग्यसेवेचा लाभ घेतात.
राज्य शासनाचे परिपत्रक धडकले
उपजिल्हा रुग्णालयाला पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे या शहरात उपजिल्हा रुग्णालय देण्यात आले आहे. आजघडीला तुमसर तालुक्यात सिहोरा येथे (Tumsar general hospital) ग्रामीण रुग्णालय १४ किमी, प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी ६ किमी चुल्हाड १४ किमी, गोबरवाही २० किमी, नाकाडोंगरी २६ किमी, लेंडेझरी २६ किमी अंतरावर असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून गरजू रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) येत असतात. तसेच मध्यप्रदेशातील बरेच रुग्ण तुमसर येथील रुग्णालयात उपचारासाठी येतात. यात बाह्यरुग्ण व आंतररुग्णांची संख्या लाखोंवर असते. तसेच गर्भवती महिला व बालरुग्ण मोठ्या संख्येने येथे रेफर होत असल्याने रुग्णालय ‘हाउसफुल्ल’ राहते.
त्यामुळे रुग्णालयाला वाढीव १०० खाटांची अत्यंत गरज होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता, (MLA Raju Karemore) आमदार राजू कारेमोरे यांनी राज्यशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पुढाकार घेतला होता त्यामुळे तुमसर करांची आता हेळसांड टळली व मंजुरीची प्रतीक्षा संपली अखेर (Sub-district hospital) उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये झाले असल्याने आमदार राजु कारेमोरे यांचे तुमसर -मोहाडी तालुक्यातील नागरिकांनी आभार मानले. तर वर्षभर दैनिक देशोन्नती ने बातम्या रेटून धरले व शासनाला मंजुरी देण्यास भाग पडल्यामुळे आ. कारेमोरे यांनी देशोन्नतीचे सुद्धा आभार मानले.
वरठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन
मोहाडी तालुक्यातील वरठी हे गाव आमदार राजु कारेमोरे यांची जन्मभुमी आहे.त्यामुळे त्यांनी तुमसर -मोहाडी तालुक्यासह आपल्या गावातील वरठी येथिल (Sub-district hospital) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन केले असल्याने वरठी येथिल व परिसरातील नागरीकांना प्रशस्त आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणी वर्धन केले असल्याने येथिल नागरिकांनी (MLA Raju Karemore) आमदार राजु कारेमोरेंचे आभार मानले.