देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर (Tumsar Heavy rain) : तालुक्यातील गर्रा/बघेडा येथे १७ जुन रोजी वादळी वाऱ्यासह (Heavy rain) पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान शेतातील आंब्याच्या झाडाखाली बांधुन ठेवलेल्या बैलजोडीच्या अंगावर विज पडल्याने बैलजोडी जागीच ठार झाल्याची घटना १७ जुन जुन रोजी दुपारी तिन वाजता दरम्यान घडली. गंगाधर आत्माराम घोडमारे रा.गर्रा) बघेडा असे पशुपालक शेतकऱ्यांचे नाव आहे.
गर्रा/बघेडा येथिल घटना
घटनेच्या दिवशी पशुपालक शेतकरी गंगाधर घोडमारे यांच्या मालकीची बैलजोडी शेतातील आंब्याच्या झाडाखाली बांधुन ठेवलेल्या (Bullock kill) बैलजोडीच्या अंगावर विज पडल्याने बैलजोडी जागीच ठार झाली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पशुपालक शेतकरी गंगाधर घोडमारे व नागरीकानी धाव घेतली. (Tumsar taluka) सदर घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली. विज पडुन बैलजोडी ठार झाल्याने शेतकरी गंगाधर घोडमारे यांचे एक लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.