तुमसरमधील आमदार पदाच्या इच्छुकाला जनतेचा पाठिंबा गमावण्याची भीती
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Tumsar-Mohadi Elections) : भांडे घासणाऱ्या बाईसारखा वारंवार पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराची स्थिती तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात (Tumsar-Mohadi Elections) चर्चेचा विषय बनली आहे. पक्षांतर करण्याचा हा सिलसिला या उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. जनतेच्या दृष्टीने वारंवार पक्ष बदलणे हे नेत्याच्या तत्त्वनिष्ठेचा अभाव दाखवते, तसेच सत्ता किंवा स्वार्थाच्या इच्छेमुळे घेतलेले निर्णय असल्याची शंका निर्माण होते.
विश्लेषकांच्या मते, या उमेदवाराच्या वारंवार पक्ष बदलण्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. मतदारांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त करत ठोस नेतृत्वाची अपेक्षा बाळगली आहे. विशेषत: ग्रामीण भागात, जिथे स्थिरता आणि निष्ठेचा मोठा अर्थ असतो, अशा परिस्थितीत नेत्यांची अस्थिरता आणि सातत्याचा अभाव त्यांना न पटणारा आहे. उमेदवाराच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि विचारधारांच्या विरोधाभासामुळे सामान्य जनतेला नेत्यांच्या तत्त्वांवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. (Tumsar-Mohadi Elections) मतदारांना आपल्या नेत्याकडून स्थिर नेतृत्वाची अपेक्षा असते. त्यांच्या मते, वारंवार बदललेले पक्ष ही त्यांची सेवा करण्याची उद्दिष्टे नसून सत्ताकारणासाठी केलेले निवडी आहेत.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, ज्याप्रमाणे भांडे घासणाऱ्या बाई दरवेळी भांडे बदलते, त्याचप्रमाणे या उमेदवाराने पक्ष बदलून विविध पक्षांमध्ये संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे. मतदार मात्र आता सजग झाले आहेत आणि या नेत्यांना योग्य धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे (Tumsar-Mohadi Elections) निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, राजकारणामध्ये निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा दृष्टिकोन आवश्यक आहे. मात्र, अशा तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या नेत्यांना जनता योग्य निर्णय घेऊन धडा शिकवेल, असा कयास व्यक्त केला जात आहे.