तुमसर तालुक्यातील मोहगांव (ख.) येथील घटना, आरोपी अटकेत
हरदोली/सि. (Tumsar Murder) : सिहोरा पोलीस स्टेशनच्या (Sihora Police Station) हद्दीत येत असलेल्या मोहगांव (खदान) येथे जुन्या वैमनस्यातून एका ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यावर काठी मारून जागीच ठार केल्याची घटना आज दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. (Tumsar Murder) सत्यवान गायकवाड वय ६० वर्षे असे मृतकाचे नाव आहे. तर शैलेश उईके वय २९ वर्षे रा.मोहगांव (ख.) असे आरोपीचे नाव असून त्याला सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी हे शेजारीच राहतात. दोन दिवसाआधी (Tumsar Murder) मृतक सत्यवान यांनी दारूच्या नशेत आरोपी शैलेश याला शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरून आज सकाळी आरोपीने मृतकाचे घर गाठून डोक्यावर उभारीने सपासप वार करून जागीच ठार केले. सत्यवान याचा खून वेगळ्या कारणातून झाला असल्याच्या चर्चा गावात सुरु आहेत. पुढील तपास (Sihora Police Station) सिहोरा पोलीस करीत आहे.