महिला सहभागातून स्वच्छतेची व्यापक जनजागृती व्हावी: उपसभापती बोरकर
लोहारा/गायमुख (Har Ghar Tiranga) : ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. पंचायत समिती तुमसर अंतर्गत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचे नेतृत्वात सर्व ग्रामपंचायत मध्ये ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ (Har Ghar Tiranga) उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तुमसर तालुकास्तरीय शुभारंभ दि. ८ ऑगस्टला पंचायत समिती तुमसर येथे पंचायत समिती सभागृहात पार पडला.
याप्रसंगी पं.स.सभापती दीपिका गौपाले, उपसभापती सुभाष बोरकर, पंचायत विस्तार अधिकारी राजू महंत, उत्तम पाठे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) पुरुषोत्तम बिसेन, सुरेंद्र ठाकरे, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) गट समन्वयक पल्लवी तिडके, समूह समन्वयक हर्षाली ढोके प्रमुखांनी उपस्थिती होते.
यावेळी बोलताना पं.स. उप सभापती बोरकर महिलांच्या स्वच्छता मोहिमेतील योगदानावर भर दिला.‘गाव पातळीवर महिलांनी स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती केल्यास केवळ परिसर स्वच्छ होणार नाही, तर आरोग्यही निरोगी ठेवण्यास मदत होईल. या (Har Ghar Tiranga) अभियानामध्ये महिलांसह नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन गाव स्वच्छ व सुंदर करावे असे आवाहन केले.
यावेळी, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राजेश्वर येरणे यांनी पालघर तिरंगा (Har Ghar Tiranga) आणि खारघर स्वच्छता या कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करत, १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.
तालुकास्तरीय कार्यक्रमानंतर खापा आणि स्टेशन टोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ (Har Ghar Tiranga) मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.