तुमसर(Tumsar):- येथील नगर परिषद क्षेत्रातील नेहरू पटागणावर (ता.२८ ) रोजी अजित पवार(Ajit Pawar), उपमुख्यमंत्री यांचा दौरा कार्यक्रम व विविध कार्यक्रमांसह जनसन्मान यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांकरिता मैदानावर येणारे मान्यवर व परिसरातील येणारे नागरिक यांचेकरिता किमान सुविधा बाबत खात्री करण्याकरिता स्वत: पाहणी करुन योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शहरातील प्रशासकिय प्रमुख या नात्यांने संबंधित प्रभारी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांच्यावर होती. मात्र संबंधित मुख्याधिकारी यांनी कार्यक्रमापुर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची साधी तसदी घेतली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )पदाधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
करिश्मा वैद्य मुख्याधिकारी यांना त्याबाबत भ्रमणध्वनीवर आमदार राजु कारेमोरे यांनी संपर्क साधला असतांना कोणत्याही स्वरुपाचे साधे अभिवादन न करता,अधिकारी कर्मचारी यांना पाठविले असे उडवाउडवीचे उत्तर देवून “काय विषय आहे यार हा” असे बोलून त्यांचा कॉल बंद केला. शिवाय झालेले आपसी संभाषण (conversation) आमदार यांची परवानगी न घेता रेकॉर्ड करुन त्या संवादाची ऑडिओ क्लिप तयार करुन सदर क्लिप जाणिवपुर्वक समाज व प्रसारमाध्यमावर पाठवली व जाणिवपुर्वक करिश्मा वैद्य यांनी ती क्लिप काही विरोधक यांचेकडे पाठविली. उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रमा करिता गांभिर्याने कार्यवाही न हाताळणे व संभाषणाची रेकॉर्डींग प्रसिध्द करुन जाणिवपुर्वक शहरातील राजकिय वातावरण तापविणा-या भ्रष्ट अधिकारी करिश्मा वैद्य,प्रभारी मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर यांचे विरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करुन सेवेतून निलंबित करावे. आमदार यांची परवानगी न घेता समाजमाध्यमावर ऑडिओ क्लिप (Audio clip) वायरल करुन त्यांची बदनामी केली असल्याने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील.व करीश्मा वैद्य यांची बदली झालीच पाहिजे,करीश्मा वैद्य हाय.. हाय.. अशी नारे बाजी उपविभागीय कार्यालायाच्या आवारात करुन प्रभारी मुख्याधिकारी करीश्मा वैद्य यांच्या विषयी निषेध करण्यात आला.
अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा सह प्रतिलिपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,प्रधानसचिव नगर विकास मंत्रालय मुंबई यांना पाठविले आहे. त्यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, अल्पसंख्याक अध्यक्ष याशिन छवारे, सरोज भुरे,पमा ठाकुर,प्रदीप भरणेकर,नानू परमार, रिंकू ठाकूर, प्रवीण भुरे,नौशाद शेख, मुकेश मलेवार, सुमित मलेवार, जयश्री गभने, मीना गाढवे, पूनम पाठक, योगेश तुळशीनंदन,जाकीर तुरक, तोशल बुरडे, अक्षय शामकुल, गुलराज कुंदवानी, मिलिंद गजभिये, जयंत पडोळे, संकेत गजभिये, एजाज कुरेशी, राकेश काबळे.आदी उपस्थित होते.(ता.प्र)