तारेच्या कुंपनातून विद्युत प्रवाह सोडून पट्टेदार वाघीनीची शिकार केल्याची आरोपींनी दिली कबुली..!
तुमसर (Tumsar) : तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या झंझेरिया -पचारा बिट 74 बी, मधील तीन पुलिया तलावाजवळ 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडे आ’ वाजता दरम्यान एका तीन वर्षीय वयस्कर पट्टेदार वाघीनीची तारेच्या कुंपनातुन विद्युत प्रवाह सोडून शिकार करुन धडावेगळे शरीराचे चार तुकडे करून जंगलात गवतात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. सदर घटनेने वनविभागात (Forest Department) एकच खळबळ उडाली आहे. वाघीनीच्या शिकार प्रकरणी वन व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत तीन शिकार्यांना अटक केली आहे.
दरम्यान घटनेच्या दिवशी 6 जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत वनविभागाने वाघीनीच्या निर्दयीपणे शिकार प्रकरणी तीन आरोपींना त्यांच्या घरून घटनेत वापरलेल्या साहित्यासह अटक (Arrested) केली आहे. राजू पिरतराम वरखडे रा.पचारा (50), दुर्गेश तुरशीदास लसुंते रा.नवेगाव (50), राजेंद्र उर्फ बस्तीराम महादेव कुंजाम रा. नवेगाव (55) असे वनविभागाच्या व पोलीस अधिकार्यानी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.
प्रकरण झंझेरिया जंगलात पट्टेदार वाघीनीची शिकार करुन चार तुकडे कापून फेकल्याचे
तीन आरोपींना अटक!
तीन आरोपींना अटक!
सविस्तर असे की, तालुक्यातील पचारा येथील शेतकरी राजू वरखडे यांनी पचारा-झंझेरिया तीन पुलिया तलावाजवळून एक किमी अंतरावर असलेल्या शेतात धानपिक नर्सरी (Nursery) घातली आहे. सदर धानपिक नर्सरीला वन्यप्राणी नासधूस करीत असल्याने आरोपी (Accused) राजू वरखडे यांनी 2 जानेवारी रोजी धानपिक नर्सरी सभोवताल तारेचे कुंपण करुन त्यात जीवंत विद्युत प्रवाह सोडून रात्री उशिरा घरी परतला.
दरम्यान 3 जानेवारी रोजी सकाळी शेतावर जाऊन बघितले असता तारेच्या कुंपनातून सोडलेल्या विद्युत तारेला पट्टेदार वाघिन विद्यूत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यावेळी राजू वरखडे याने नवेगाव येथील आरोपी दुर्गेश लसुंते व राजेंद्र उर्फ बस्तीराम कुंजाम यांना घरी बोलावून घेत विद्युत शॉकने (Electric Shock) मृत्यू झालेल्या वाघीनीचे विल्हेवाट लावण्यासाठी घरातील सुरी व कुर्हाडीच्या साहाय्याने वाघीनीच्या शरीराचे चार तुकडे कापून सदर तुकडे एका पोत्यात भरून सायकलच्या सहाय्याने एक किमी अंतरावर असलेल्या पचारा-झंझेरिया तीन पुलिया तलावाजवळील जंगलातील गवतात सदर चार तुकडे फेकून देत विल्हेवाट लावली.
तुकडे कापून शिकार केल्याचे उघडकीस आले…
सोमवारी 6 जानेवारी रोजी तुमसर वनविभागाचे कर्मचारी पचारा-झंझेरिया बिट मध्ये गस्त घालत असताना पचारा-झंझेरिया बिट मधील तीन पुलिया तलावाजवळ वयस्कर पट्टेदार वाघीनीचे (Tiger) मान, धडाचे दोन तुकडे, शेपटीचा एक भाग असे चार तुकडे कापून शिकार केल्याची उघडकीस आली. त्यावेळी तीन दिवसांपूर्वी शिकार करुन तुकडे करून फेकलेल्या तुकड्यांचा उग्र वास येत होता. दरम्यान घटनेची माहिती होताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली व घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) व नागपूर, भंडारा व तुमसर येथील वन अधिकार्यांने धाव घेतली.
चार तुकड्यात कापून फेकलेल्या वाघीनीच्या शवाची तपासणी पशू वैद्यकीय अधिकार्यांनी केली. वाघीनीची शिकार विद्युत प्रवाहाने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान वनविभागाच्या अधिकार्यांच्या (Forest Department Officers) उपस्थितीत वाघीनीच्या शवाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी (Eviction Officer) रितेश भोंगाडे,तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी सि. जी.रहांगडाले, करीत आहेत.