शिरडशहापूर येथील घटना; विदर्भातील व्यापार्यावर गुन्हा दाखल
हिंगोली (Turmeric purchase Fraud) : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील शेतकर्याची (Turmeric purchase Fraud) हळद खरेदी करून १४ लाख २३ हजार रूपयाने फसवणूक केल्याने विदर्भातील एका व्यापार्यावर औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील शिवहार सुदाम चटप या शेतकर्याकडे विदर्भातील यवतमाळ येथील शेख खुद्दूस शेख इब्राहिम हा व्यापारी २४ ऑक्टोंबर रोजी शिरडशहापूर येथे आला होता. जवळपासच्या शेतकर्यांची (Turmeric purchase Fraud) हळद असल्यास ती पण खरेदी करण्याचे शेख खुद्दूस यांनी चटप यांना सांगितले. त्यावरून शेख खुद्दूस यांनी हळदीची पाहणी केल्यानंतर १३ हजार ३०० रूपये क्विंटल दराने हळद खरेदी करण्याची कबुल केले. त्यावरून ११७ क्विंटल हळद शेतकर्यानी विक्री केली होती. शेख खुद्दूस या व्यापार्याने हळद खरेदी करून ट्रकमध्ये भरून वसमतच्या हळद बाजारात विक्री केली.
त्या ठिकाणी मिळालेल्या १५ लाख ६६ हजारापैकी शेतकर्यांना १ लाख ४३ हजार रूपये दिले व उर्वरित रक्कम लगेच देतो असे म्हणून लघुशंकेचा बहाणा करून पळ काढला. शेतकर्यांनी बरीच प्रतिक्षा पाहिल्यानंतर शेख खुद्दूस आलाच नाही. (Turmeric purchase Fraud) बराच शोध घेतल्यानंतर भ्रमणध्वनी संपर्क साधण्याचा प्रयत्न शेतकर्यानी केला; परंतु शेख खुद्दूस या शेतकर्याचा भ्रमणध्वनी बंदच येत होता. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख खुद्ददूस या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.