जवळा बाजार (Hingoli) :- औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात एका कारमधून नेण्यात येणारे देशी दारूचे (country liquor) बारा बॉक्स 13 मार्चला रात्रीच्या सुमारास पोलिसांनी पकडले परंतु पोलिसांना पाहून कार चालकाने पलायन केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की होळी (Holi) व धुलीवंदन सना निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच अवैध दारूवर (Illegal liquor) कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे जवळाबाजार पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी अवैध दारूवर कारवाई करण्याकरता निघाले असताना वगरवाडी शिवारातून एका कारमध्ये अवैध दारू साठा विक्री करण्याकरता नेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांना मिळतात 13 मार्चला रात्री 80च्या सुमारास वगरवाडी शिवारातील जिंतूर टी पॉइंट वर असलेल्या जयस्वाल यांच्या देशी दारूच्या दुकानाजवळ मिळालेल्या माहितीतील कार दिसून आली. पोलिसांना पाहून चालकाने पलायन केले. कारची तपासणी(Inspection) केल्यानंतर त्यामध्ये 44, 720 रुपयाचे 12 देशी दारूचे बॉक्स मिळून आले. यामध्ये पोलिसांनी दहा लाख रुपयांची कार आणि 44,720 रुपयाचा दारू साठा असा एकूण दहा लाख 44 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हाळे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कार्यक्रमात एम. एच. 38 व्ही 35 69 च्या चालकावर 14 मार्च गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला .ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार दिलीप नाईक, इम्रान सिद्दिकी, गडदे, बेले, मदार, यांच्या पथकाने केली आहे.