हिंगोली(Hingoli):- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मारलेल्या छाप्यात बारा देशी दारूचे(country liquor) बॉक्स जप्त करून सहा जणांवर महाराष्ट्र (Maharashtra) दारूबंदी कायद्यांतर्गत १९४९ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारूबंदी कायद्यांतर्गत १९४९ कलमांतर्गत गुन्हे दाखल
७ सप्टेंबर रोजी कोरडा दिवसच्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हिंगोली व दुय्यम निरीक्षक हिंगोली बीट क्रमांक १, २, ३ च्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य वाहतूक, विक्री विरूद्ध कारवाई करून सहा आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत बारा देशी दारूचे बॉक्स असा एकूण ४६ हजार ३३० रूपये किंमतीचा अवैध दारूसाठा (Illegal storage of liquor) हस्तगत करून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, दुय्यम निरीक्षक कृष्णकांत पुरी, ज्योती गुठ्ठे, जवान टी.एस.आडे, के.एन.कांबळे, दशरथ राठोड, पंडित तायडे, वाहन चालक वाघमारे यांनी पार पाडली आहे.