कर्नाटकातील मेंगलाेर येथे कारवाई
अमरावती (Gondi Modak case) : स्थानीक फ्रेझरपुरा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येणाèया वडाळी परिसरातील दिव्य सदन येथे गत 4 मार्च राेजी ऋषीकेश उफर् गाेंडी माेडक याची हत्या करण्यात आली हाेती. या (Gondi Modak case) प्रकरणात फ्रेझरपुरा पाेलीसांनी दाेन आराेपींना अटक केली आहे.
आराेपींना कर्नाटक राज्यातील मेंगलाेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. फ्रेझरपुरा पाेलीसांच्या डीबी स्काॅडने ही कामगिरी बजावली आहे. विजय टांटीया भाेसले (31) व अरियान चेनबाबू पवार (27) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पाेलीस दाेन्ही आराेपींना घेवून उद्या बुधवारी 12 तारखेला अमरावती येथे पाेहाेचणार असल्याचे पाेलीस सूत्रांनी सांगितले आहे. ऋषीकेश उफर् गाेंडी माेडक याची गत 4 मार्च राेजी वडाळी येथील दिव्य सदन परिसरात दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी अडवून हत्या केली हाेती.
गाेंडी (Gondi Modak case) यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले हाेते. यावेळी गाेंडी याचा साथीदार घटनास्थळावरून निघून गेला हाेता. पाेलीसांनी त्यास चाेर माहुली येथून शाेधले हाेते. त्याने हत्येचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला हाेता. (Gondi Modak case) गाेंडी याचा काही दिवसापूर्वी परिसरातील काही नागरिकांसाेबत वाद झाल्याची माहीती पाेलीस तपासात पुढे आली हाेती. यातून गाेंडी याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले हाेते.
यानंतर पाेलीसांनी हल्लेखाेरांचा शाेध सुरु केला हाेता. (Gondi Modak case) हल्लेखाेर कर्नाटक राज्यातील मेंगलाेर येथे असल्याने पाेलीसांचे एक पथक कर्नाटकात पाेहाेचले हाेते. यानंतर पाेलीसांनी विजय भाेसले व अरियान पवार यांना मेंगलाेर येथून ताब्यात घेतले. त्यांना उद्या बुधवारी अमरावतीमध्ये आणण्यात येणार असून अन्य पसार आराेपींचा शाेध घेतला जात आहे.