वारंवार त्याच जागेवर होतोय अपघात
वसमत (Wasmat Accident) : वसमत-नांदेड रस्त्यावरील कनेरगाव शिवारात 26 जानेवारीच्या रात्री झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत पुलाच्या कठड्याला धडक देऊन हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम होत आहे. कामातील त्रुटीमुळे एकाच जागेवर वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहेत. या प्रकाराकडे गांभीर्य लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
26 जानेवारीच्या रात्री नऊच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच 26 सी एल 13 20 या दुचाकीवरून दोन तरुण नांदेडहून परभणी कडे जात होते वसमत तालुक्यातील कनेरगाव शिवारात या दुचाकीला अपघात झाला रस्ता दुभाजकाच्या कठड्यावर दुचाकी आदळल्याने झालेल्या या (Wasmat Accident) अपघातात नरेंद्र राजकुमार दीक्षित राहणार परभणी सुमित साहेबराव जोगदंड राहणार नांदेड हे दोघे दुचाकी स्वार ठार झाले आहेत. या गंभीर अपघाताची खबर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे ,पोलीस उपनिरीक्षक मुपडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्तांना (Wasmat Accident) उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मयतांची ओळख पटवून नातेवाईकासोबत संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. मयताचे नातेवाईक वसमत मध्ये दाखल झाले. वसमत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे अद्याप या प्रकरणी तक्रार देण्यात आली नसल्याने गुन्हा नोंद झालेला नाही. अपघाताचे नेमके कारण काय हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.
याच जागेवर वारंवार का होत आहेत अपघात
वसमत नांदेड रस्त्यावरील कनेरगाव शिवारात एकाच जागेवर वारंवार अपघात होत आहेत. अनेक बळी जात आहेत महिन्याभरापूर्वी याच जागेवर नांदेडहून मध्यरात्री दुचाकी वर येणारे दोन जण ठार झाल्याची घटना घडली होती. या (Wasmat Accident) अपघातात कठड्याला धडक देऊन अपघात झाला. प्रथमदर्शनी दिसत होते मात्र नंतर या प्रकारात टिप्परने धडक देऊन अपघात झाला, अशी तक्रार देण्यात आली होती, त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता पुन्हा त्याच जागी दोन दुचाकीस्वार एकाच वेळी ठार झाल्याची घटना घडली आहे वाहनधारकासाठी हा पॉईंट मृत्यूचा सापळा होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम संत गतीने होत आहे कामात अनेक त्रुटी राहिले आहेत. सुरक्षिततेच्या उपायोजना करण्यात आलेले नाहीत त्यामुळे वाहनधारकाचे बळी जात असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराशी संपर्क साधून वारंवार (Wasmat Accident) अपघात होणाऱ्या या पॉईंटवर हायलाईटर अपघात पवन क्षेत्र अशा सूचना देणारा फलक व इतर उपायोजना खबरदारी घेण्यासंदर्भात कळवले आहे. तातडीने या रस्त्यावर गुत्तेदाराने उपाययोजना कराव्यात अशा सूचना देण्यात आले, असल्याचे गजानन बोराटे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.