बोरगाव मंजू (Akola):- बोरगाव मंजू शेतशिवारातील शेतकर्याने आपल्या शेतात झाडाखाली बैलजोडी बांधून ठेवली होती. त्या दरम्यान मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने (Rain)हजेरी लावली. याच दरम्यान झाडाखाली बांधलेल्या बैल जोडीवर वीज (Electricity)कोसळून दोन बैलांचा मृत्यू (Death)झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
स्लग- बोरगाव मंजू येथील घटना
बोरगाव मंजू येथील शेतकरी अभिमन्यू बारस्कर यांच्या मालकीचे दोन बैल (Ox) त्यांनी आपल्या शेतात एका झाडाखाली बांधले होते. दरम्यान मंगळवारी रात्री दोन बैलांचा अंगावर वीज कोसळली. यातच दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. सदर बाब बुधवारी सकाळी उघडकीस आली. यात सदर शेतकर्याचे एक ते सव्वा लाख रुपये किमतीची बैलजोडी या नैसर्गिक आपत्तीत सापडली. ऐन पेरणीच्या वेळेस सदर शेतकर्याच्या बैलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता पुढे काय होणार, या विवंचनेत असलेल्या शेतकर्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी सर्वसामान्य शेतकर्यांची(Farmers) मागणी आहे.