लातूर(Latur):- उत्तरप्रदेशातील दोन अल्पवयीन बाल कामगारांची लातूरमध्ये दोन हाॕटेल्समधून (Hotels)सुटका करण्यात आली. याप्रकरणी त्या बालकांना कामास ठेवणाऱ्या २ हॉटेलमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (एएचटीयु) ने मंगळवारी ही कारवाई (action) केली.
दोन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
लातूरमधल्या काही आस्थापनांमध्ये बालकांचा कामगार म्हणून वापर करण्यात येत आहे, याबाबत गुप्त माहिती मिळाली. माहितीची खात्री करून २ शासकीय पंचासह मध्यवर्ती बस स्थानक(bus station) लातूर जवळील २ हॉटेल आस्थापनांवर वर छापा टाकला असता १४ व १५ वर्षीय उत्तर प्रदेश राज्यातील २ बालकास बालकामगार म्हणून ठेवल्याचे निदर्शनास आले. दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळा पुढे हजर केले असता त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे. सदर प्रकरणी सोलापूर चिकन चायनीज सेंटर(Chicken Chinese Center) मध्यवर्ती बस स्थानका जवळ, हॉटेल चालक फुरकान मुस्ताक कुरेशी (रा. ६० फुटी रोड, लातूर) व हॉटेल टेस्टी झोन काँग्रेस(Congress) भवन च्या मागे हॉटेल चालक मिनाज युनूस घावरी (रा. खोरी गल्ली लातूर) यांंच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात(Police stations) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवालदार चित्तलवाड हे करीत आहेत. सदरची कारवाई सहा पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, फौजदार सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुदामती वंगे, लता गिरी, चालक मणियार व चाईल्ड लाईनच्या अलका सन्मुखराव यांच्या पथकाने केली.
18 वर्षाखालील बालकास स्वतःच्या आर्थिक(Financial) फायद्यासाठी, वस्तू, सेवांची विक्री करण्यासाठी व नोकरीच्या उद्देशाने स्वतःच्या आस्थापनेमध्ये गुंतवून ठेवणे, बालकास गुलाम म्हणून वागविणे, बालकाची कमाई रोखून ठेवणे, बालकाच्या कमाईचा स्वतःच्या हेतूसाठी वापर करणे, बालकांकडून शारीरिक श्रम करून घेणे अशा प्रकरणी बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 अन्वये संबंधित स्थापना चालकाविरुद्ध कारवाईची(action) तरतूद करण्यात आली आहे.




