परभणी(Parbhani):- शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या एका महाविद्यालयात(colleges) शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थीनी (Minor students) सोमवार १२ ऑगस्ट पासून बेपत्ता झाल्या आहेत. सदर विद्यार्थीनींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले असेल, अशी तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सीसीटिव्ही कॅमेर्याची पाहणी केली असता दोन्ही मुली रोडने जात असताना दिसून आल्या
या बाबत एका मुलीच्या पालकांनी तक्रार (complaint) दिली आहे. सदर पालक नेहमी प्रमाणे मंगळवारी दुपारी आपल्या मुलीला महाविद्यालयातून नेण्यासाठी आले होते. तिच्या फोनवर संपर्क केला असता मुलीचा मोबाईल बंद येत होता. या बाबत पालकाने महाविद्यालयात जावून विचारपूस केली असता सदर मुलगी महाविद्यालयात आली नसल्याचे समजले. याच दरम्यान दुसरे एक पालक देखील आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आले होते. महाविद्यालयाच्या बाहेरील रोडवर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्याची पाहणी केली असता दोन्ही मुली रोडने जात असताना दिसून आल्या. शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी मुलींचा शोध घेण्यात आला. मात्र त्या मिळून आल्या नाही. अज्ञात व्यक्तीने फुस लावून अज्ञात कारणासाठी मुलींना पळवून नेले असेल, अशी तक्रार कोतवाली पोलिसात देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.