लातूर (Latur):- धनेगाव येथील मांजरा धरणाचे दोन दरवाजे शुक्रवारी (दि.27) दुपारी 1 वाजता बंद करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धरणाचे(Dam) क्रमांक तीन व चार चे दोन दरवाजे 0.25 मीटरने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तत्पूर्वी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले होते.
दोन दरवाजे 0.25 मीटरने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात आला
दरम्यान जलसंपदा विभागाने (Department of Water Resources)धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने शुक्रवारी (दि.27) दुपारी 1 वाजता 2 दरवाजे बंद केले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 4 दारे 0.25 मीटरने सुरू असून मांजरा नदीपात्रात 3494 क्युसेक (98.96 क्युमेक) इतका विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे, नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.