अहमदपूर तालुक्यातील वळसंगी पाटीजवळ अपघात
हडोळती (Ambulance Accident) : शेतातून घराकडे पायी परतणाऱ्या दीर-भावजय यांना भरधाव रुग्णवाहिकेने जोराची धडक दिल्याने यात दोघांचा मृत्यू झाला. अहमदपूर तालुक्यातील वळसंगी पाटीजवळ शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा (Ambulance Accident) अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंगी पाटीजवळ शुक्रवारी सांयकाळी ६ च्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका शिरूरकडे भरधाव वेगात जात होती. वळसंगी येथील शेतकरी छायाबाई गुरमे (वय ६५ वर्षे) व बाबुराव गुरमे (वय ७०) हे शेताकडून घराकडे येत होते. त्याच वेळी रुग्णवाहिका (क्र. एमएच २४/ एयू ५८६५) ने दोघांना धडक दिली. (Ambulance Accident) अपघातानंतर दोघांनाही तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. यात छायाबाई गुरमे यांचा अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तर बाबुराव गुरमे यांचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघाताने वळसंगी गावावर शोककळा पसरली आहे.
चालकाचा मुलगा चालवित होता रुग्णवाहिका…
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी गौतमी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयीन कामकाजासाठी रुग्णवाहिका पाठवली होती. सदर (Ambulance Accident) रुग्णवाहिका ही चालकाच्या मुलाने चालवल्याची बाब निदर्शनास आली आहे. वरिष्ठांनी चौकशी करून कार्यवाही करावी, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी गौतमी कांबळे यांनी ‘देशोन्नती’शी बोलताना दिली.