आखाडा बाळापुर (leopard attack) : कळमनुरी तालुक्यातील (Kalmanuri Taluka) पावनमारी शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) दोन शेळ्या ठार झाल्या आसल्याच शेतकर्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावनमारी शिवारामध्ये शंकर पुरभाजी भुरके यांचे शेत आहे. शेतात त्यांनी पाच शेळ्या व इतर जनावरे बांधली होती.
कडाडून चावा घेतल्याने एक शेळी गंभीर जखमी
आज रात्री पाऊस येत असल्यामुळे भुरके हे घरी झोपण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्या शेतात आला. (leopard attack) बिबट्याने शेतातील दोन शेळ्या फस्त केल्या. तर एका शेळीच्या मानेला कडाडून चावा घेतल्याने एक शेळी गंभीर जखमी झाली. आज पहाटे चार वाजता भुरके हे शेतात गेले असताना त्या ठिकाणी दोन शेळ्या ठार झालेल्या दिसून आल्या तसेच गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. त्यांनी परिसरात पाहणी केली असता (leopard attack) बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या शेळ्या ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पावनमारी येथील सरपंच, दिलीप मिरटकर यांनी या घटनेची माहिती (Forest Department) वनविभागाला दिली तसेच पशू वैद्यकीय अधिकार्यांना या प्रकाराची माहिती दिली.
या भागात बिबट्या आला होता का हे स्पष्ट होणार
वनविभागाच्या (Forest Department) वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तातडीने घटनास्थळी झाली आहे. तर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बी. यु. बोरकर, डॉ. एस. एम. पाटील यांच्या पथकाने शेळ्यांची उत्तरीय तपासणी केली आहे. वन विभागाच्या पथकाने परिसरामध्ये (leopard attack) बिबट्याच्या पायाच्या ठस्याचे छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. त्यावरून या भागात बिबट्या आला होता का हे स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सदर बिबट्या आहे किंवा नाही, याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही. शेतकर्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र शेतात जाताना जाणे टाळावे, असे आवाहन (Forest Department) वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.