पवनी (Bhandara):- जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे(heavy rain) व सततच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला असून वैनगंगा नदी दुथळी भरुन वाहत आहे.
पवनी येथील वैनगंगा नदी (Wainganga River) काठावरील दोन घरकुल पूरामुळे नदीचे काठ खचल्याने उध्वस्त झाले. दोन्ही कुटूंबांना शासनाकडून घरकुल मिळाले होते. नदीच्या पूरामुळे नदीकाठ खचल्याने काठावर बांधलेल्या दोन घरकुलांच्या भिंती ध्वस्त झाल्या. यामुळे दोन्ही कुटूंबावर बेघर होण्याची पाळी आली.