नांदेड(Nanded):- इतवारा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पथकाने ब 14 मे रोजी दुपारी कारवाई करून घातक शस्त्र (weapon) बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रक गावठी पिस्तुल, जिवंत काडतुस, तलवार, चाकू आदी शस्त्र जप्त केले.
आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर(Illegal business) कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना अर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे यांना 14 मे रोजी दुपारी रोजी 3.45 वाजताच्या सुमारास देगलुर नाका येथील कापुस संशोधन केंद्राच्या (Research Centers)गेटच्या बाजुला सिमेंटच्या नाल्यावर इसम सय्यद अवेस सय्यद खलील(24) रा.हबीबीया मस्जिद जवळ खुदबे नगर इतवारा व शेख समीन ऊर्फ अरबाज रौफ (23) रा. असद मदणी कॉलनी मदणी मस्जिद जवळ देगलूर नाका हे गावठी पिस्तुल (Gavathi Pistol) ,जिवंत काडतुस(live cartridge), तलवार(sword), चाकु ताब्यात बाळगुन असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 1 गावठी पिस्तुल, 1 जिवंत काडतुस, 1 तलवार , 1 चाकु आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संग्राम जाधव हे करीत आहेत.