Arni :- तालुक्यातील कवठा बाजार येथील पुलावर पुरात अडकलेल्या आष्टा येथील दत्ता निकुरे, मुसा खान या दोन जणांचा कवठाबाजार येथील इस्रायल शेख याने प्राण वाचविले आहे. ईसापुर धरणा मधील वाढती पाण्याची पातळी वाढली होती. यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला (Panganga River) पूर आल्याने कवठा बाजार येथील पुलाच्या वरून वाहत असताना आष्टा येथील दत्ता निकुरे व मुसाखान याच पुलावरून मोटरसायकलने परत गावाकडे जात असताना पुरात अडकलेल्या दत्ता निकुरे, मुसा खान या दोन जणांना स्थानिक इस्रायल शेख यांनी दोघांना सुखरूप पुरातून बाहेर काढले. यावेळी त्यांची मोटरसायकल पुरातच अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच तलाठी राजेश चौधरी त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी इस्रायल शेखसह कवठाबाजार ग्रामस्थांचे आभार मानले.