नांदेड(Nanded) :- रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीला धडक दिल्याची घटना 26 मे रोजी घडली.या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले असून एकजण गंभीर जखमी(seriously injured) झाला आहे. बिलोली तालुक्यात चालु असलेल्या सगरोळी, नागणी, हुनगुंदा, येसगी येथील वाळू डेपोच्या नावावर अगदी नियम व अटी गुंडाळून बेसुमार वाळूचे उत्खनन व वाहतूक(Transportation) होत आहे. अशाच प्रकारे २६ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सगरोळी घाट क्र. २ येथून वाळूने भरलेला हायवा देगलुरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना सगरोळी बसस्थानकाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक(hit hard) दिल्याने दुचाकीवरील मोईन शेख राहणार हिप्परगा व नवीन पवार रा. सगरोळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ असून नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
आमदारासह तहसिलदार यांची भूमिका अस्पष्ट
मांजरा नदी पात्रात बेसुमार होत असलेले वाळूचे उत्खनन, वाळू डेपोत(Sand depot) केला जाणारा अतिरिक्त वाळूचा साठा, यातुन होत असलेली अवैध वाहतूक याबाबत गेल्या कांही महिन्यापासून बिलोली तालुक्यात ओरड चालू आहे. अनेकांनी शासन दरबारी तक्रारी केल्या आहेत. तरी पण कांही अधिकाऱ्यांनी ठोस अशी कारवाई केली असल्याचे दिसून आले नाही.