उपविभागीय दंडाधिकारी जीवराज डापकर यांचा आदेश
परभणी (Parbhani Crime) : गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून दोघांना परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर यांनी आदेश काढले आहेत. (Parbhani Crime) हद्दपार इसमांना जिल्ह्याबाहेर नेऊन सोडण्यात आले आहे.
समाज विघातक इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने अशा इसमांविरुध्द प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पाठविला जातो. पालम पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सुरेश उर्फ मोदी कालिदास घोरपडे याला जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या (Parbhani Crime) बाबतचा आदेश मिळाल्या नंतर संबंधिताला पोलिसांनी जिल्ह्याबाहेर नेऊन सोडले. त्याच प्रमाणे धनंजय रामकिशन देसाई याला देखील सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सदर इसमाला जालना जिल्ह्यात नेऊन सोडण्यात आले. हद्दपारी बाबत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आदेश काढले आहेत.