परभणी (Parbhani):- औंढा महामार्गवरील टि पॉईंटर (t point) भरधाव आयशर व दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जख्मी (seriously injured) झाल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अ
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील टि पाईट वर दि.18 जून दिवसा 4 च्या सुमारास भरधाव आयशर वाहनाने दुचाकीचा समोरून जोराची धडक (hit)दिली या अपघातात दोन जण गंभीर जख्मी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना नागरिकांनी त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात राजेश शिवाजी वाकुडकर वय 30 वर्ष रा. ताटापूर ता. जिंतूर यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर मार लागला लागल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती तर परमेश्वर किसन खापरे वय 35 वर्षे रा.रिडज,ता. जिंतूर यांच्या दोन्ही हातावर कमरेवर व पाठीवर मार लागल्यामुळे दोन्ही जखमींना वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन काळे यांनी उपचार (treatment)करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील हलवण्यात आले आहे याबाबत वृत्त लिहिपर्यंत जिंतूर पोलिसात घटनेची नोंद झालेली नाही.