कारंजा (Washim):- दोन ट्रॅव्हल्स विचित्रपणे एका ट्रेलरला धडकल्याने नागपूर – संभाजीनगर हायवेवर(Highway) अपघात घडला. यात 9 प्रवासी जखमी झाले. ही घटना 21 जून रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजीनगर हायवेवरील तराळा गावाजवळ घडली.
नागपूर-संभाजीनगर हायवेवरील घटना
संजयकुमार सोमवंशी वय 40 वर्ष रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर(Ahemadnagar) , गजानन राजाराम पराड वय 54 वर्ष रा.पुणे , पद्माकर उदापूरकर वय 62 वर्ष रा.बेनोडा ता. अमरावती , उमेश अरुण शेंडे वय 32 वर्ष रा. बोरी ता. चांदुर रेल्वे , विजय ज्ञानेश्वर ग्जबे वय 32 वर्ष रा. वरुड जि. अमरावती , मीनाक्षी विजय गजबे वय 50 वर्ष रा. वरुड जि. अमरावती ,चंद्रशेखर दोहाते वय 36 वर्ष रा. वरुड , नवल नथुजी देवते वय 40 वर्ष रा. लोणी ता. वरूड व संगीता नवल देवते वय 34 वर्ष रा. लोणी ता. वरुड अशी या अपघातात (Accident)जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सची उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, संभाजीनगर (Sambhajinagar)कडून नागपूरच्या दिशेने येणारी एक ट्रॅव्हल्स (Travels)प्रवाशांच्या लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. एवढ्यात मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक(hit) दिली. त्यामुळे उभी असलेली ट्रॅव्हल्स समोरच्या एका ट्रेलरला धडकली, त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच लोकेशन 108 कारंजाचे पायलट किशोर खोडके व डॉ. अजयकुमार मिश्रा हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काही जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आले तर काहींना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय (Hospital) प्रशासनाने दिली आहे. दरम्यान,या अपघातामुळे संभाजीनगर-नागपूर हायवेवर काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र, त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.