कोरेगाव/चोप (Gadchiroli) : देसाईगंज तालुक्यातील चोप व कोरेगाव (Koregaon) येथील 23 आणि 24 तारखेला सलग दोन दिवसात दोन (Heatstroke) उस्माघाताने बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. चोप येतील दामाजी वंगणू मडावी वय 55 हे 23 तारखेला वाजंत्री म्हणून काम करत होते. कोरेगाव येथील विवाहात बँड वाजवून घरी परतल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटल्याने उपचारासाठी नेन्या आधीच मृत पावले. त्यांच्या मागे दोन विवाहित मुले आहेत.
ही बातमी घडल्यानंतर अवघ्या पाचशे मीटर अंतरावरील कोरेगाव (Koregaon) येथील यशवंत विश्राम वालदे (वय 60) हे मजुरी कामावरून आज दुपारी दोन वाजता घरी पोहोचले. तहान लागल्याने आंबील पिली काही वेळातच अस्वस्थ वाटल्याने. त्यांचेही उपचारा आधीच निधन झाले. यशवंतच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले व एक अविवाहीत मुलगा असा मोठा परिवार आहे. दोन दिवसात (Heatstroke) उष्माघाताचे अचानक दोन बळी गेल्याने परिसरात हळहळ वक्ते केला जात आहे. आरोग्य विभागाकडून उन्हात बाहेर पडू नये. सोबत पुरेसा पाणी वापरावे झाडांच्या छायाचा आसरा घ्यावा. अस्वस्थ वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केलेले आहे.