परभणी(Parbhani):- सेलु-वालुर रस्त्यावर ब्राह्मणगाव पाटीवर भरधाव येणाऱ्या मॅक्स गाडीच्या चालकाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident)दुचाकी चालक जखमी झाला. ही घटना २९जुन रोजी दुपारी ५ वाजता घडली. याप्रकरणी मॅक्स गाडीच्या चालकावर ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
नवीन कायदेनुसार अन्वये मॅक्स गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती, याप्रमाणे सेलू- वालूर रस्त्यावर ब्राह्मणगाव पाटीवर घटनेचे दिवशी २९जुलै रोजी दुपारी ५ वाजता पांढऱ्या रंगाच्या मॅक्स गाडी क्रमांक एम. एच.३८/१२६० निष्काळजीपणे गाडी चालविणाऱ्या चालक नागोराव गोविंदराव वाटुरे वय ५५ वर्षे राहणार बोरगाव याने या रस्त्यावरून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.२२ ए.वाय.३२११वरील चालक दगडोबा भुजंगराव काकडे यांना धडक दिली. या अपघातात दगडोबा काकडे यांच्या डोक्यास जबर मार लागला असून डावा पाय फ्रॅक्चर झाला असुन दुचाकी चे १५ हजार रुपयांचे नुकसान(damage) झाल्या प्रकरणी सुरेश दगडोबा काकडे वय २१ वर्षे राहणार कन्हेरवाडी तालुका सेलू याने दिलेल्या फिर्यादीवरून नवीन कायदेनुसार अन्वये मॅक्स गाडीचा चालक नागोराव गोविंदराव वाटुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत.