हिमायतनगर(Nanded):- हिमायतनगर तालुक्यातील सोनारी गावाजवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना दिनांक २३ में रोजी घडली असून या अपघातात दोन्ही दुचाकी वरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक
हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी गावाजवळ एम.एच.२६ सी. डी.९२८४ नंबरची मोटारसायकल भोकर मार्गाने हिमायतनगर कडे मंगेश ढोले व बालाजी ढोले जात होते व एम. एच. २६ सि. बी. ५७७९ नंबरची स्प्लेंडर दुचाकी हे हिमायतनगर मार्गाने भोकर कडे दुचाकीवरून वैभव राजु गोरे हे जात होते असे घटनास्थळावरून वर्त समजले आहे. या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक (strike) झाल्याने तीन जण गंभीर जखमी (seriously injured) झाले. घटना समजताच सोनारी येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हिमायतनगर पोलीस स्टेशनला सुचना दिल्याने हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जराड, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, बिट जमादार सिंगनवाड , यांच्यासह चार ते पाच पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून गावकऱ्यांच्या मदतीने जखमी झालेल्या तिघांना रुग्णवाहिका द्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात(government hospital) हलविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शरद जराड यांनी सांगितले आहे.