तुमसर(Bhandara):- मोहाडी तालुक्यातील बेटाळा जि.प क्षेत्रातील बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ जुन रोजी दुपारी रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू असताना समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी येथिल डॉक्टरला मारहाण (beating)केल्याची घटना समोर आली.
बैठकीचे निमंत्रण का नाही दिलं? म्हणून डॉक्टर ला बेदम मारहाण
१९ जुन रोजी दुपारी तालुक्यातील बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Centers) रुग्ण कल्याण समीतीची बैठक सुरु असताना,जि.प सदस्य नरेश ईश्वरकर यांनी पंचायत समिती सदस्याला बैठकीचे निमंत्रण का दिलं नाही, या कारणावरून ईश्वरकर यांनी डॉक्टर सोबत वाद घालून मारहाण केली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी पवन पाचघरे (३०) यांनी नरेश ईश्वरकर यांच्याविरुद्ध रात्री उशिरा १९ जुन रोजी मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांवर मोहाडी पोलीसांनी जि.प सदस्य नरेश ईश्वरकर यांच्यावर भांदवी कलम ३५३,३३२ अन्वये गुन्हा(crime) दाखल केला आहे.सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.