बुलढाणा (Ganesh Sonune) : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या एकनिष्ठ असलेले गणेश सोनुने (Ganesh Sonune) यांची दिव्यांग सेलच्या अंगीकृत संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख बुलडाणा विधानसभा या पदी नियुक्ती पत्र देवून करण्यात आली आहे. सर्वसामान्याचे काम करण्याची आवड असलेले, मनमिळावू व्यक्तीमहत्व, शिवसेना उबाठा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात नेहमी तत्पर असलेले सामाजिक कार्यकर्ता गणेश सोनुने यांची निवड ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे बोलल्या जात आहे.
पक्षाने त्यांच्यावर बुलडाणा विधनसभा कार्यक्षेत्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ध्येयधोरण शिवसैनिक सोबत घेऊन तळागळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीवर लक्ष केंद्रीत करून स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने पुनीत झालेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बाजू मजबूत करावी, सोबतच पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्ष संघटन शक्तीशाली करावे, असे दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद आहे. (Ganesh Sonune) त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आनंद व्यक्त होत आहे.