नवेगावबांध (Gondia):- येथील आझाद चौकातील एका फुल, हार व पूजा साहित्य विक्रीच्या दुकानात चक्क उदमांजराने हजेरी लावली. त्यामुळे भर चौकात एकच खळबळ माजली होती. वनविभागाच्या (Forest Department) जलद बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून, उदमांजराला ताब्यात घेऊन, जंगलात सोडून दिले. वन विभागाच्या जलद बचाव दलाच्या सर्तकतेमुळे अशाप्रकारे उद मांजराला जीवदान मिळाले आहे.
वन विभागाच्या जलद बचाव दलाच्या सर्तकतेमुळे अशाप्रकारे उद मांजराला मिळाले जीवदान
दि.७ फेब्रुवारी रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता हा थरार एरव्ही गजबजलेल्या आझाद चौकात नवेगावकरांनी अनुभवला.
ऊद मांजराला पाहायला शेकडो लोक गोळा झाले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. येथील आझाद चौकात किशोर झुरमुरे यांचे फुले, हार, पूजा साहित्य व फळ विक्रीचे दुकान आहे. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मुलगा ओम दुपारी शाळेतून दुकानात आला. मोबाईल पाच दुकानात बसला असताना खाली काहीतरी चुळबूळ होताना त्याला दिसली. त्याने निरखून पाहिले असता भला मोठा उदमांजर त्याला दिसला. घाबरून पळत जाऊन आपल्या वडिलांना त्यांने दुकानात काहीतरी विचित्र प्राणी असल्याची माहिती दिली. ते दुकानात आल्यानंतर त्यांना दुकानात काहीतरी विचित्र प्राणी (Animal)असल्याचे दिसले.
भ्रमणध्वनी वरून त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली
ताबडतोब वन विभागाचे विशेष जलद बचाव पथकाचेजलद बचाव दलाचे अमोल चौबे,विक्रांत ब्राह्मणकर,शुभम मेश्राम व त्यांचे सहकारी हे घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले.दुकानात त्यांनी निरखून पाहिले असता, उदमांजर असल्याची त्यांना खात्री झाली.रेस्क्यू करून सदर उदमांजराला ताब्यात घेतले. सदर उदमंजर अंदाजे तीन किलो वजनाचा असावा.सदर उद मांजराला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. अशी माहिती पथक सदस्य अमोल चौबे यांनी दिली आहे.