लढतीतील उमेदवार सतीशचंद्र रोठे यांचा सवाल!
बुलढाणा (Satish Chandra Rothe) : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचे मंदिर (Shivaji Maharaj Mandir) उभारणार असल्याची घोषणा जाहीरनाम्यात जाहीर करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सदर घोषणा त्यांच्या बुलढाण्यातील उमेदवार जयश्रीताई शेळके यांना मान्य आहे का..? असा सवाल बुलढाणा विधानसभेचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सतीशचंद्र रोठे (Satish Chandra Rothe) यांनी करून हे विचारावे व तसे जाहीर करावे, असे आवाहन केले आहे.
सतीशचंद्र रोठे (Satish Chandra Rothe) पुढे म्हणाले की, हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंनी हिम्मत असेल तर मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, पिक विमा, सोयाबीन कापसाचे भाव, एसटी विलीनीकरणावर भूमिका जाहीर करून दाखवावी. एसटी विलणीकरणाच्या लोकलढ्यात 125 कष्टकरी कामगारांचा मृत्यू झाला. त्यावेळी मुख्यमंत्री असतांना ब्र शब्द न बोलणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जाहीरनाम्यातील वल्गना वांजोट्या आहेत.
मुंबईत असून विलनीकरण आंदोलनाला भेटायला न येणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) साधी चौकशी एसटी कामगारांची केली नाही तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना भूमिका जाहीर केले नाही. हिम्मत असेल तर मराठा आरक्षण, विलानीकरण, 125 आत्महत्याग्रस्त एसटी कष्टकरी कामगारांच्या मृत्यूवर भूमिका जाहीर करावी. अन्यथा वाजून त्या वल्गना बंद कराव्या असे आवाहन बुलढाणा विधानसभेचे महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीशचंद्र रोठे पाटील (Satish Chandra Rothe) यांनी केले आहे.