आ. डॉ. राहुल पाटील, विशाल कदम यांच्या प्रचारार्थ सभा
परभणी (Uddhav Thackeray) : शहरातील जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर शनिवार ९ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडीचे परभणी, गंगाखेड विधानसभा निवडणूकीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील, विशाल कदम यांच्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी सुरु आहे. पुर्वतयारीसाठी खा. संजय जाधव यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सभेचे नियोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले विद्यालय मैदानावर होणार्या सभेच्या स्टेज आणि आसन व्यवस्थेसह विविध प्रकारच्या उपाययोजनाची पाहणी महाविकास आघाडी व शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.
शनिवार ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे परभणी विधानसभेतील उमेदवार आ. डॉ. राहूल पाटील व गंगाखेड विधानसभा मतदार संघातील उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. सभेला हजारोंच्या संख्येने मतदार तथा विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाने केले आहे.