Uddhav Thackeray on Waqf Act amendment Bill : नुकतच मोदी सरकार ३.० ने ‘वक्फ बोर्ड अधिनियम – १९९५’ या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर केलं. यासंदर्भात आधी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ४० सुधारणांवर चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी व काही संघटनांनी विरोध केला आहे. इंडिया आघाडीतील पक्ष या सुधारित विधेयकाच्या विरोधात आहेत. या विधेयकाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाच पडला.संसदेबाहेर विधेयकास विरोध केल्याने हिंदुत्ववादी संघटना व पक्ष ठाकरे गटाविरोधात आक्रमक झाले आहेत.शिवसेनेनं गेल्या अनेक दशकांपासून हिंदुत्वाचं राजकारण केलं आहे. त्यामुळे वक्फबाबतच्या सुधारित विधेयकाला विरोध दर्शवणाऱ्या ठाकरे गटाला हिंदुत्ववादी संघटनांचा रोष पत्करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला, गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गट काँग्रेसबरोबर आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदानही केलं.
उद्धव ठाकरे बनले‘वक्फ बोर्ड ’चे मशीहा
ज्या बाळासाहेब ठाकरे यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना स्थापन केली, रुजवली आणि वाढवली; त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी करताना दिसून येत आहेत त्या मुळे सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की शिवसेना ठाकरे गट आता नेमका कोणाचा परंतु त्यांनी 8 ऑगस्ट ला एका सभेला केलेल्या संबोधनात ते ‘वक्फ बोर्ड ’चे मशीहा बनलेले दिसून आले.लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला.
संजय राऊतांकडून सारवासारव
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सारवासारव करत म्हणाले, आमचा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक भाग आहे. विधेयक मांडलं तेव्हा खासदारांनी उपस्थित राहणं अत्यावश्यक नव्हतं. कारण विधेयक मंजूर झालेलं नाही. वक्फ बोर्डाच्या कामकाजावर चर्चा व्हायला हवी, असं आम्हाला वाटतं. जमीन घोटाळे ही एक मोठी समस्या असली तरी ते केवळ वक्फ बोर्डापुरतं मर्यादित नाही. या घोटाळ्यांच्या समस्येवर व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे.
ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय? खासदार अरविंद सावंत म्हणाले…
मात्र शिवसेनेने (उबाठा) या विधेयकाचा निषेध नोंदवला नसलयामुळे मुस्लिम नेते व संघटना त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते झुबेर आझमी म्हणाले, ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अरविंद सावंत यांच्याशी मी बोललो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की, ते या विधेयकाचा विरोध करतील. मी त्यांना म्हटलं की पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. भूमिका न मांडल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या पक्षाबाबत नाराजी पसरली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत अधिकृत वक्तव्य येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. अरविंद सावंत हे ज्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत त्या मतदारसंघात मुस्लिम मतदार २५ टक्के आहेत व सावंत येथून ५०,००० मतांनी जिंकले आहेत.




