उदगीर/ लातूर (Udgir Accident) : राष्ट्रीय मार्गावरील डिग्रस तालुका उदगीर जवळील पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने (Udgir Accident) गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Udgir Police) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आज गुरुवारी दि.२७ दाखल करण्यात आला आहे.
दोघे ठार, बहीण गंभीर जखमी
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उदगीर मधील रहिवासी फिर्यादी आसिफ हबीबखॉ पठाण वय ३२ ऑटो चालक रा. गोविंद नगर, नांदेड रोड उदगीर यांची आई, भाऊ व बहीण हे छत्रपती संभाजीनगर मधून भाऊ जाफर आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करून कारमधून क्र.एम.एच.१२ वायए ५४२६ ने. ते उदगीरकडे येत होते. दरम्यान मौजे डिग्रस येथे कारचालक नामे नौमान कुरेशी रा.शकील चौक, उदगीर यांने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवल्याने गाडी (Udgir Accident) पुलाच्या कठड्याला धडकली. यात फिर्यादीची आई शबीरबी पठाण वय ५५ वर्षे., भाऊ जाफर पठाण वय २५ वर्षे. यांचा मृत्यू झाला. तर बहीण शाहीन ही गंभीर जखमी झाली. हा गुन्हा करून कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. उदगीर पोलीस ठाण्यात (Udgir Police) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.