भाजयुमो जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी विरोधात मोर्चा!
उदगीर (Udgir Assembly Constituency) : उदगीर विधानसभा मतदारसंघ महायुतीत विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या वाट्याला जाणार असल्याचे मानले जात असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांनी घड्याळ ‘भाऊ’ला धक्का देणारे वक्तव्य केले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात (Udgir Assembly Constituency) भारतीय जनता पार्टीचाच (Bharatiya Janata Party) उमेदवार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्या सदरील दाव्याने महायुतीत ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
उदगीर विधानसभा भाजपाच लढणार- अमोल निडवदे
भारतीय जनता पार्टीचे मतदारसंघात मोठे प्राबल्य आहे. प्रत्येक गावात, वॉर्डांत, पक्षाचे मजबूत व मोठे संघटन आहे. त्याबळावर, पक्षाने आजवर उदगीर विधानसभा मतदारसंघात बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे, सदरील मतदारसंघ महायुतीत (Bharatiya Janata Party) भारतीय जनता पार्टीसाठी इतरांसाठी सोडणार नाही, असा विश्वास अमोल निडवदे यांनी व्यक्त केला आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघ (Udgir Assembly Constituency) भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो. त्यामुळे ही जागा येणाऱ्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच लढविणार असल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले असून यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. १९९९ पासून ते २०१९ पर्यंत ५ विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ४ वेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. आणि २ वेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खूप कमी मतांनी पराभूत झाला आहे. असे चित्र असताना आपल्या हक्काची जागा मित्रपक्षाला देणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
उदगीर विधानसभेसाठी भाजपाकडून (Bharatiya Janata Party) अनेकजण इच्छुक आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपा ज्येष्ठ नेते पंडित सूर्यवंशी, प्रदेश सचिव बालाजी गवारे, ज्यांनी अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळविली असे युवा नेतृत्व विश्वजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्री साधूराम कांबळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रसाद नाईकवाडे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
उदगीर विधानसभा मतदारसंघात (Udgir Assembly Constituency) पार्टी वाढविण्यासाठी अनेकांनी आपल्या हाडाचे काड आणि रक्ताचे पाणी केले आहे. सदरील जागा सोडून देणे म्हणजे सर्व निष्ठावंतांना दुःखी करण्याचे काम ठरणार आहे. ज्या कार्यकर्त्याने आपला पूर्ण वेळ देत पक्ष वाढविण्यासाठी योगदान दिले, पार्टीची ओळख वाडी तांड्या पर्यंत पोहचविली, तळागाळापर्यंत पक्ष नेला, त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत ही जागा (Bharatiya Janata Party) भाजपच लढवेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.