बनसोडे म्हणतात, माझ्यामुळेच…तर भालेरावांनी दाखविला चक्क आरसा!
उदगीर (Udgir-Degalur National Highway) : मागची पाच वर्षे शांत असलेले राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. उदगीर ते देगलूर राष्ट्रीय महामार्गावरून श्रेयवाद उफाळला असून माजी आमदार सुधाकर भालेराव (MLA Sudhakar Bhalerao) यांनी जारी केलेला १० ऑक्टोबर २०१८ रोजीचा सरकारी कागद चांगलाच चर्चेत आहे. (Udgir-Degalur National Highway) सदरील मार्ग क्रीडा मंत्री संजय बनसोडे (MLA Bansode) हे आमदार होण्यापूर्वी मंजूर झाला असून श्रेय लाटण्याच्या बनसोडे (MLA Bansode) यांच्या केविलवाण्या प्रयत्नांबद्दल सोशला मिडियात ‘हास्यकल्लोळ’ उठला आहे.
मागच्या आमदाराच्या काळात मंजूर असलेले काम स्वतःच्या नावावर छापून घेण्याची सवय क्रीडा मंत्र्यांना लागली आहे. केवळ आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या जात असून, उदगीर मतदारसंघात दिसत असलेली सर्व महत्वाची विकासकामे, ही माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली आहेत. सध्या संजय बनसोडे (MLA Bansode) सत्तेच्या खुर्चीवर असल्यामुळे, जे काही होत आहे ते फक्त माझ्यामुळे होत आहे.! असा जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप माजी आमदार सुधाकर भालेराव (MLA Sudhakar) Bhalerao यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर, संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री असल्यानेच ते विकासकामे खेचून आणत असल्याचे सत्ताधारी कार्यकर्ते सांगत आहेत.
भविष्यात कलगीतुरा रंगणार..
बसस्टँड, तहसील इमारत, आरटीओ ऑफिस, एमआयडीसी, पंचायत समिती इमारत, (Udgir-Degalur National Highway) रस्ते विकास, सिंचनाच्या सुविधा, बॅरेजेस, आदी मुद्द्यावरून क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यात कलगीतुरा रंगणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत एकतर्फी वाटत असलेला सामना आता रंगात आला असून माजी आमदार सुधाकर भालेराव (MLA Sudhakar Bhalerao) यांची तुतारी जोरदार वाजत आहे.