उद्द्ल माटे यांच्या आकस्मित मृत्यूने बोटेझरी गावावर शोककळा
मालेवाडा/नागपूर (Udhal mate) : नेहमी हसतमुख चेहरा, कोणत्याही पान टपरीवर गेले की गोरगरिबांना चहा पाजणारा, पक्षीय राजकणाकारणापलीकडची मैत्री जपत संधीचे सोनं करणारा राजकारणातील अष्टपैलू कार्यकर्ता उद्धल माटे (Udhal mate) सध्या काळाच्या पडद्याआड गेला आहे.
सोमवारी उद्दल माटे (Udhal mate) मालेवाडा गावातील नारायण इंगोले यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला आले होते. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर ते उमरेडला जात असताना धुरखेडा गावाजवळील सोयाबीन फॅक्टरी जवळ डुक्कर गाडीला आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना प्रारंभी उमरेड व त्यानंतर नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले मात्र तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. बोटेझरी या सातशे लोकसंख्येच्या व जंगल व्याप्त खेड्यामध्ये उद्दल माटे यांचा जन्म झाला. बोटेझरी गावाची 1994 मध्ये प्रथम ग्रामपंचायत ची स्थापना झाली त्यानंतर या गावाचा प्रथम सरपंच होण्याचा मान उद्दल माटे यांना मिळाला. त्यानंतर 2007 मध्ये कारगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती अशी दोनदा त्यांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये माटे यांच्या पत्नी नेमावली ह्या पुन्हा बोटेजरी गावाच्या सरपंच म्हणून निवडून आल्या.
दरम्यान नांद जिल्हा परिषद ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकीट मिळवण्यात यश प्राप्त झाले. व या निवडणुकीत नियमावली माटे (Udhal mate) निवडून आल्या नंतर थेट जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पदी त्यांची वर्णी सुद्धा लागली. कोणत्याही पक्षात सक्रिय कार्यकर्ता नसताना मात्र स्वकर्तुत्वावर व राजकारणापलीकडची मैत्री उद्दल माटे यांनी जपल्याने राजकारणात यशस्वी होता आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्याम कुमार बर्वे, संजय मेश्राम, राजू पारवे, तक्षशिला वागदरे, दर्शनी धवड, जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.