पाथरी(Pathri):- श्री विठ्ठल अर्बन निधी लि . पाथरी या संस्थेला दिलेल्या धनादेश अनादर प्रकरणी पाथरी प्रथम वर्ग न्यायालयाने संस्थेचे कर्जदार श्रीहरी भाऊसाहेब शेंडगे, रा. अंधापुरी ता. पाथरी यांना ६ महिन्याची शिक्षा (Punishment) व ५८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
दंड न भरल्यास शिक्षेत २ महिने वाढ होईल असा आदेश दिला आहे . या निर्णयामुळे कर्ज बुडव्यामध्ये खळबळ उडाली असून पतसंस्थेच्या ठेवीदारांना मात्र दिलासा मिळाला आहे . श्रीहरी भाऊसाहेब शेंडगे यांनी विठ्ठल अर्बन या संस्थेकडून २०१ ९ मध्ये १ लाख ३० हजारांचे कर्ज घेतलेले होते .
ते कर्ज वेळेवर भरत नसल्यामुळे पतसंस्थेने (credit institution) न्यायालयात धाव घेतली होती . सदरील प्रकरणी मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी पाथरी प्रथम वर्ग न्यायाधीश जयक्रांती पांचाळ यांनी श्रीहरी भाऊसाहेब शेंडगे यांना सदरील शिक्षा सुनावली. विठ्ठल अर्बन संस्थेच्या वतीने अड एस.एस.सिद्दीकी यांनी कामकाज पाहिले .