ब्रिटिश पंतप्रधानांचा शांतता प्रस्ताव सादर
लंडन (Ukraine-Russia war) : व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यात झालेल्या जोरदार वादविवादानंतर, झेलेन्स्की ब्रिटनच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांची भेट घेतली. दरम्यान, लंडनमध्ये (Ukraine-Russia war) युक्रेनवरील संरक्षण शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये युरोपीय देशांचे नेते सहभागी झाले होते. या शिखर परिषदेत झेलेन्स्की देखील उपस्थित होते. या शिखर परिषदेत सर्व नेत्यांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला.
We are at a crossroads in history.
It is time to act. pic.twitter.com/ip4d3z9kQx
— Keir Starmer (@Keir_Starmer) March 2, 2025
युरोपीय देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे
शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) म्हणाले की, युरोपीय देशांच्या नेत्यांनी शिखर परिषदेत युक्रेनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी असेही म्हटले की, यावेळी (Ukraine-Russia war) युरोपीय देश इतिहासातील एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहेत. आणि आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, आता कृती करण्याची वेळ आली आहे.
युक्रेनला ब्रिटनची मोठी मदत
शिखर परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांनी युक्रेनला 5000 हून अधिक क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मदत करण्यासाठी 1.6 अब्ज पौंडांच्या वित्तपुरवठ्याच्या कराराची घोषणा केली. केयर स्टारमर म्हणाले की, “प्रत्येक देशाने स्वतःची भूमिका बजावली पाहिजे.” ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी संरक्षण शिखर परिषदेत (Ukraine-Russia war) युक्रेनच्या सुरक्षेसाठी चार-चरणीय योजना जाहीर केली.
