मानोरा(Washim):- तालुक्यातील गिरोली गावातील २ ग्रामसंघ पदाधिकारी व गावातील ४० समूहातील ४०० महिला यांनी आज दि. १ ऑक्टोबर रोजी गिरोली येथे मशाल फेरी काढली.
महिलांनी मशाल फेरी काढून सरपंच यांना दिले निवेदन
मशाल फेरी नंतर सर्व महिलांनी गावातील सरपंच यांना उमेद अभियानाच्या मागण्या शासन स्थरावर मंजूर व्हावे, याकरिता २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti)च्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेत ८४ लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागा अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे करिता ठराव मंजूर करावा. महिलांच्या उपजीविका वाढीसाठी गाव पातळीवर वेगवेगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज खऱ्या अर्थाने महिला चूल आणी मूल मधून बाहेर पडत आहे. उमेद अंतर्गत महिला सक्ष्ममीकरण व गरिबी निर्मूलनाचे गाव पातळीपर्येंत मोठ्या प्रमाणात कामे करणाऱ्या विभागाला व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना कायम करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणीने कंबर कसली आहे.