उमरगा (Umaraga Accident) : लातूर येथून उमरगा तालुक्यातील तुरोरी या गावाकडे मोटारसायकल वरून जाणारे दोघे पतीपत्नी लक्ष्मी पाटीजवळ अनधिकृत उभे असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण उपचारावेळी मरण पावल्याची घटना बुधवार (दि.18) रात्री उशिरा घडली.
याबाबतची माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील एक जोडपे कामानिमित्त लातूर येथे गेले होते. सर्व कामे संपल्यावर सायंकाळी उशिरा लातूर येथून परत उमरगा तालुक्यातील तुरोरी या गावाकडे मोटारसायकल वरून येत होते. ऊस घेऊन कारखान्याच्या दिशेने जाणारा ट्रक्टर रोडच्या मधोमध उभे करून ड्रायव्हर गेल्याने व पाठीमागे कसलेही दिशादर्शक चिन्ह नसल्याने मोटारसायकलवरून जाणारे (एम एच 25/ 7075) प्रमोद भानुदास कराळे वय. 42, हे अचानक उभारलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने जागीच ठार (Umaraga Accident) झाले तर त्यांची पत्नी प्रणिता प्रमोद कराळे (वय 38), हे उमरगा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पुढील उपचारासाठी लातूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान गुरुवारी (दि.19) रोजी दुपारी त्याही मरण पावल्या.
त्यांच्या पश्चात मयत प्रमोदची आई, भाऊ, भावजय, तीन मुली त्यात अनुक्रमे दहा, आठ व सहा वर्षांच्या मुली असा परिवार आहे. लहान वयात काळाने घाला घातल्याने तुरोरी गावातून व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तुरोरी बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (Umaraga Accident) दोघांनीही गुरूवारी सायंकाळी एकाच चितेवर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.