उमरेड (Umred MLA) : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान वाचवण्याची भूमताप देऊन अनुसूचित जातीच्या लोकांची मते घेतली मात्र सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर काँग्रेसने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट न करता चुप्पी साधल्याने काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे (Umred MLA) उमरेड विधानसभा क्षेत्रातून बीएसपी चा हत्ती विधानसभेत पोहोचवावा असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे (Adv. Sunil Dongre) यांनी केले.
ते उमरेड येथील भव्य महिला मेळाव्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला संविधानात समता बंधुता न्याय या मूल्याचा अंतर्भाव केला. काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष मनुवादी विचाराची असून यापासून सावध राहण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. (Umred MLA) कार्यक्रमाला नागपूर जिल्हा प्रभारी मोहन गायकवाड उमरेड प्रभारी शशिकांत मेश्राम, भीमराव गजभिये, उमरेड विधानसभा अध्यक्ष पुणेश्वर मोडघरे, रंजना ढोरे, विद्याताई राईकवार आदी मान्यवर उपस्थित होते.