पुसद महाविकास आघाडीचा एकमताने ठराव
पुसद (Mahavikas Aghadi) : राज्यात महाविकास आघाडीला जनतेचा पाठींबा मिळत असल्याने (Mahavikas Aghadi) महविकास आघाडीचा भाग नसलेले पुसद मधील अनेक ईच्छूक नेते/कार्यकर्ते ऐनवेळी आघाडीत येऊन उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) ज्या घटक पक्षाला जागा सुटेल त्या पक्षाने सध्या कार्यरत असलेल्या कार्यकत्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळो त्याच्याचसाठी सर्व ताकतीने काम करून पुसद मतदारसंघातील नाईकांची हुकुमशाही संपवली पाहिजे अश्या आशयाचे मत काँग्रेस चे जेष्ठ नेते डॉ.मो.नदीम, राष्ट्रवादी लीगल सेल प्रदेशाध्यक्ष अँड.आशिष देशमुख,सेवानिवृत्त समाजकल्याण उप आयुक्त तथा आदिवासी समाजाचे नेते, राष्ट्रवादी( श. प. )तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य,शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक आदिवासी नेते रंगराव काळे,माजी जी.प.माजी सदस्य तथा राष्ट्रवादी (श.प.)जिल्हा सरचिटणीस सुरेश धनवे यांनी विचार व्यक्त केले.
सभेला कॉग्रेस पक्षाचे नेते सय्यद इस्तियाक,अनिल शिंदे, झिया शेख, अब्दुल वहाब, जब्बार लाखे, सय्यद तहसीन, सोहेल चव्हाण ,राष्ट्रवादी श. प. पक्षाचे साहेबराव ठेंगे, नानाभाऊ जळगावकर, साकीबशहा,अशोक बाबर,संजय पाटील कान्हेकर, सिद्दिक अहमद , धनंजय सक्तेपर, नवाज अली,शेषराव राठोड, देविदास डाखोरे,उबाठाचे नेते मोहन विश्वकर्मा, विकास जामकर, विशाल जाधव,विजय बाबर ,हरिष गुरुवाणी, संजय भोणे, रवी पांडे, युवासेनेचे साकला, श्रीमती मिश्रा, गाजुद्दीन शेलू तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सभेचे संचालन उबाठा नेते मोहन विश्वकर्मा यांनी तर आभार जब्बार लाखे यांनी मानले.