असंवैधानिक सरकारचे सीएम दिल्लीचे पोपट
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Sanjay Raut’s allegation) : महायुती सरकार (Mahayuti government) हे केवळ लुटमारीचे सरकार आहे. स्वबळावर बनलेल्या सरकारचे लोक आता निवडणुका बघून उधळपट्टी करीत आहेत. शहा, फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे. त्यांच्या धन्याने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. २०१४ च्या निवडणुकीच्यावेळी १५ लाखांचे दिलेले आश्वासन फोल ठरले. आता महिलांना १५०० रुपये देऊन त्यांची क्रूर चेष्टा करीत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर नक्कीच सत्तापरिवर्तन होणार असल्याचा आशावाद शिवसेना नेते तथा उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज येथे व्यक्त केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिव सर्वेक्षण मोहिमेचा भाग म्हणून अकोल्यात आलेले खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना राज्यातील (Mahayuti government) महायुती सरकार हे केवळ लुटमारीचे सरकार असल्याचा घणाघाती आरोप केला. राज्यातील असंवैधानिक सरकारचे मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीचे मिडू आहेत, भाजपाच्या दिल्लीतील दोन्ही नेत्यांसमोर त्यांचे काहीही चालत नसल्याचा आरोपही राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर नक्कीच सत्तापरिवर्तन होणार आहे.
राज्यात सत्तापरिवर्तन नक्कीच होणार
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर नक्कीच सत्तापरिवर्तन होणार आहे. महिलांना अधिकाधिक मदत करून समृध्द करू, असे सांगून संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्तुत्य काम केले असून, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला आहे.
महिलांना अधिकाधिक मदत करून समृध्द करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्तुत्य काम केले असून, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला गुजरातसाठी लुटणाऱ्या शिंदे फडणवीस (Mahayuti government) सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळविला आहे, असा आरोप खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात आगामी निवडणुका एकजुटीने लढवेल आणि सत्तेत येईल, असा विश्वास खा. राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, राहुल कराळे प्रामुख्याने उपस्थित होते.