कोरची , धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकर्यांचे अर्ज सादर
कोरची/धानोरा (Farmers debt relief) : शेतकर्यांना संपुर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी किसान ब्रिगेडच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी सरसावले असून आज २८ मे रोजी कोरची, धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले.
कोरची – कोरची तहसील कार्यालयात किसान ब्रिगेडच्या वतीने कोरची तालुक्यातील (Farmers debt relief )शेतकर्यांनी दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते यांच्या नेतृत्वात कर्जमुक्तीचे अर्ज तहसीलदार प्रशांत गडृम यांना सादर केले. तहसीलदार गड्डम यांना कर्जमुक्तीचे अर्ज व निवेदन देतेवेळी शेतकरी राजाराम नैताम , हेमप्रकाश कोरेटी,जामसाय नैताम,हीरालाल घावडे,बाबुलाल गंगभोईर,तुकाराम दरवडे,किरपाराम अडभैया,भगवती कुमरे,संगुणा नैताम,कल्लीराम कोरेटी,तुरमकुमाय कडयाम,गणेश कुमरे,चंद्ररसाय झुरी, कार्तीक मडावी,बस्तर हलामी,सुलतान पुडो,कांता कोराम,केवळराम मेश्राम,रामको मडावी,कमलेश गंगभोईय,वसंत काटेंगे,टोमेश काटेंगे, झुमुक पुराम, रतन साहाळा, बालकरणसिंग कुंजाम,अमरसिंग मडावी,सौ.इंदिराबाई पडोटी,मोहन लाडे,दुर्जन करशी,श्रीराम निंबेकर,नंदकिशोर वैरागडे,सौ.रश्मी वैरागडे,कृष्णाजी कावळे,रामसाय बोगा,सौ.रनोबाई पोरेटी,कृषी दरवडे, संदीप बन्सोड,काशीनाथ दरवडे,विश्वनाथ दरवडे,किशन कोराम,मोहन हलपसिंग सौ.निर्मलबाई अंबादे,अंकुश अंबादे,दयाराम मडावी,श्रावण नुरोटी,संदिप बन्सोड,नामदेव दरवडे,श्रीराम भोगांडे,यासहित मोठया संख्येने शेतकरीबांधव उपस्थित होते.
धानोरा – तालुक्यातील शेतकर्यांनी देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तुफान उंदिरवाडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना (Farmers debt relief) कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले. यावेळी शेतकरी देवनाथ शिंपी, उमेश सयाम , डोनू सोनुले , सखमसिंग पदा, घनश्याम सहारे , यशवंत मडावी , सदाशिव सहारे , श्रीहरी लोनबले, r, गणेश पदा , मनीबाई पदा, केशव उसेंडी, सत्यवान मांदाळे, वासुदेव पदा, बाबुराव येरमे,मंदाबाई म्हशाखेत्री, रंजना मडावा, सुमन गुरनुले, , गणु कोरचा , डोमाजी वाडगुरे , सुमन बालदे, मुरलीधर बागा , तेजनाथ शिंपी तसेच शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.