माहूर तालुक्यातील पापलवाडी येथील घटना!
माहूर (farmer death) : शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण म्हणून बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैल पोळ्याचा सण असल्याने गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू होती. मात्र,बैलाला चरण्यासाठी व धुण्यासाठी गेलेल्या (farmer death) तरुण शेतकरी विलास दारासिंग राठोड वय ३० व बैलाला विजेचा धक्का (electric current) लागल्याने दुर्दैवी मृत्यू death झाल्याची घटना दि.२ रोजी १२ वाजताच्या तालुक्यातील हिवळणी येथे घडली.
शेतात काबाडकष्ट करणाऱ्या जिवा भावाचा सखा असलेल्या बैलांवर जीवापाड प्रेम करून त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणारे अनेक शेतकरी आहेत. पोळा सण असल्याने बैलजोडीला सजविताना त्यापूर्वी त्यांची आंघोळ घातली जाते. त्यासाठी (farmer death) मयत विलास धारासिंग राठोड हा तरुण शेतकरी बैल जोडी घेऊन शेतात गेला होता. त्या पैकी एका बैला च्या पायात विद्युत प्रवाह सुरू असलेला केबल अडकला.
हे बघून बैलाला वाचविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ही विजेचा शॉक लागला यात बैल आणि शेतकरी या दोघांचा दुर्दैवी (farmer death) मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती गावात पसरताच गावावर शौककळा पसरली सिंदखेड पोलीस (Sindakhed police) ठाण्याचे जमादार गजानन कुमरे यांनी घटनास्थळ पंचनामा केला तर आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ संदेश राठोड यांनी शविच्छेदन (post mortem) केले.