माडगी (Woman Dead Body) : तुमसर तालुक्यातील माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना प्रेत आढळले. घटनेची माहिती पोलिसांना कळताच तुमसर पोलिस निरीक्षक चमूसहित घटनास्थळी दखल झाले असून पंचनामा केले असता प्रेत पंधरा दिवसांपूरवीचे कुजलेल्या अवस्थेत (Woman Dead Body) महिलांचे प्रेत आढळले. अंदाजे वय ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे असून जुना ब्लाऊज, गळ्यात पिवळ्या मण्याची गाठी आढळून आली.
शरीराचा मासाचा भाग मासोळयांनी खाललेल्या अवस्थेत मिळाला. त्यात ओळख काढणे हे पोलिसांना आव्हान करणारी घटना दि.२३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली असून (Woman Dead Body) प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. घटनास्थळी उपसरपंच ज्ञानेश्वर कांबळे, माजी सरपंच पंचबुध्दे, माजी जि.प.सदस्य के.के.पंचबुध्दे, स्नेहल रोडगे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.